
नटराज दांडिया स्पर्धा २०२५चा दिमाखदार समारोप
बारामती :- येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित नटराज दांडिया स्पर्धा २०२५चा समारोप मोठ्या उत्साहात झाला. रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरण दांडियामय झाले.
या स्पर्धेत विविध गट व स्पर्धकांनी चमकदार सादरीकरण करत विजेतेपद पटकावले.
बेस्ट ग्रुपमध्ये रत्नावली डान्स वर्ल्ड ग्रुपने प्रथम, ऐश्वर्या शिंदे डान्स ग्रुपने द्वितीय तर रोहित स्कूल ऑफ गरबा डान्सने तृतीय क्रमांक मिळवला.
बेस्ट कपलमध्ये ओमकार पिल्ले व निखिल पवार प्रथम,स्नेहा जायभाय व पूनम जाधव द्वितीय तर रेश्मा दिवेकर व भारती पाटील तृतीय ठरले.
बेस्ट मेल डान्सरचा मान झेन इनामदार (प्रथम), आर्मीत दोशी (द्वितीय) आणि मेष भिसे (तृतीय) यांनी पटकावला.
बेस्ट फीमेल डान्सरमध्ये आकांक्षा शहाने प्रथम, शलाका दोषीने द्वितीय तर अर्चना जोशीने तृतीय क्रमांक मिळवला.
बेस्ट ड्रेसअपसाठी श्रावणी शहा प्रथम, रुचिता चोरमले द्वितीय आणि ओवी झगडे तृतीय ठरल्या.
बेस्ट बालकलाकार विभागात लब्धी शहाने प्रथम, नित्यम कोठारीने द्वितीय तर मीरा देशमुखने तृतीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोमानी ग्रुप, स्काय ग्रुप, हिंद स्वीट्स, मुक्ती ग्रुप, स्वराज फर्निचर मॉल, श्रद्धा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, मोरे कन्स्ट्रक्शन, बागल कन्स्ट्रक्शन, एस. एच. जगताप कन्स्ट्रक्शन, दिया सिल्क व के मार्ट या संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“बारामतीतील तरुणाईला कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे व पारंपरिक दांडिया संस्कृतीचा उत्सव जपला जावा, हाच या स्पर्धेचा उद्देश आहे,” अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.