राज्यात आजपासून सहा दिवस महत्वाचे; जोरदार पावसाचा इशारा

राज्यात आजपासून सहा दिवस महत्वाचे; जोरदार पावसाचा इशारा

 

पुणे: परतीच्या मान्सूनचा मुक्काम गुजरातमध्ये असल्याने बिहार, गुजरातसह महाराष्ट्राला आगामी सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवार (दि. 22) ते शनिवार (दि. 27) या सहा दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने मराठवाड्याला 120 ते 200 मि.मी. पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

मान्सून यंदा 8 सप्टेंबरपासूनच पूर्व राजस्थानातून निघाला आहे. मात्र तो अत्यंत कमी वेगाने खाली येत आहे. गत दहा दिवसांत तो फक्त गुजरातपर्यंत आला आहे. तो महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने राज्यात 22 ते 27 सप्टेंबर या सहा दिवसांत मोठ्या पावसाचा अंदाज आहे. खास करून मराठवाड्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

असा राहील पाऊस (तारखा)

- मराठवाडा: अतिवृष्टी: (22, 23, 26, 27)

- कोकण: अतिवृष्टी: (24 ते 27), मुसळधार (22 व 23)

- मध्य महाराष्ट्र: मुसळधार (22, 23, 27)

- विदर्भ: अतिवृष्टी: (25 ते 27), मुसळधार (24)