
बारामतीत नवरात्रोत्सवा निमित्त माळावरील देवी मंदिरात विविध कार्यक्रम
बारामती :-[प्रतिनिधी] येथील माळावरचे देवीची तुळजाभवानी चे प्रतिरूप म्हणून सर्वदूर ख्याती आहे. नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक देशाच्या विविध भागातून व राज्यभरातून बारामतीमध्ये येत असतात.
आज सोमवार दि.२२सप्टेंबर रोजी ब्राह्ममुहूर्ता पासून दुपारी मध्यान्हा पर्यंत कुलाचारा नुसार घटस्थापना करून पारंपारिक पध्दतीने शारदीय नवरात्रोत्सव साजरा करावा.
शुक्रवार दि २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी निमित्त देवीची काठी उभारणे,मंगळवार दि.३० सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी निमित्त होम विधी रात्री १२ नंतर नवमी (घट उठणार) बुधवार ०१ ऑक्टो बर रोजी नवमी घट उठविणे,गुरु वार २ ऑक्टोबर विजयादशमी- दसरा रात्री १२ नंतर देवीची पाल खी सीमोल्लंघनासाठी प्रस्थान ठेवणार आहे.आज सोमवारी घट स्थापना झाल्यापासून नवरात्र उठे पर्यंत पहाटे ५ वाजले पासून रोज मंदिर मध्यरात्री१२वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
गाढवे यांच्या गेली सहा पिढ्यांपासून गाढवे कुटुंबीय उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत.यामध्ये हरिभाऊ गाढवे,सोमलिंग गाढवे,अतुल गाढवे,राहुल गाढवे,प्रमोद गाढवे, प्रशांत गाढवे,दिनेश गाढवे यांचे सह परिवार आदींचा समावेश आहे.
बारामतीकर देवीभक्त नवरात्र उत्सवात उत्साहाने नवरात्रोत्सवात सहभागी होत असतात.पूर्वी जुन्या काळात मंदिराच्या सभोवती जंगल होते. आता वाढत्या नागरिकीकरणा मुळे गाव वाढत असल्याने मंदिर शहराच्या मध्यभागी आले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून दर मंगळवारी व शुक्रवारी तसेच पौर्णिमेला भाविक मोठ्यासंख्येत येत असतात.नवरात्रात बारामती सह सोलापूर, सातारा,सांगली, अहिल्यानगर आदी भागातून व नोकरीनिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी असेलेले भाविक आवर्जून देवी दर्शनाला येतात.
नवरात्र उत्सवात देवीची विविध नऊ रूपे साकारण्यात येतात. उत्सवानिमित्त मंदिरास रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.मंदिराचे परिसरात पाळणे,झोके,आकर्षक खेळणी,खाद्य पदार्थांचे स्टाॅल, विक्रेते यांनी आपली दुकाने थाटली असून नऊ दिवस जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते.
भाविक म्हणून देवीभक्त राजकीय मंडळी येत असतात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. जळोची येथील देवीचे भक्त कै.दत्तात्रय गाढवे यांना वाढत्या वयोमानाने तुळजापूर येथे दर्शनाला जाता येत नसल्याने त्यांची भक्ती पाहून त्यांच्या स्वप्नामध्ये तुळजापूरच्या तुळजा भवानी देवीने दर्शन देऊन मी तुमच्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला,आणि तुम्ही चालत रहा आणि जिथे मागे वळून बघाल तेथे मी प्रगट होईल असे सांगितले परंतु चालत असताना गाढवे यांनी पाठीमागे वळून पाहिले त्यानुसार सदर देवी तेथे प्रगट झाली व त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले अशी आख्यायिका आहे.