आम्ही इथे "गोट्या खेळायला" आलेलो नाही; कर्जमाफीबाबत विचारताच अजित पवारांचा पारा चढला; व्यक्त केला तीव्र संताप

आम्ही इथे "गोट्या खेळायला" आलेलो नाही; कर्जमाफीबाबत विचारताच अजित पवारांचा पारा चढला; व्यक्त केला तीव्र संताप

 

बीड: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका तरुणाने विचारलेल्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला. हा प्रश्न कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विचारण्यात आला होता, ज्यामुळे अजित दादांचा तोल सुटला. अजित पवार यांनी आज (दि २५) पहाटेपासूनच पाहणी दौरा सुरू केला आहे. ते सध्या बीड जिल्ह्यात आहेत.

दरम्यान पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना, मदत आणि दिलासा देण्याऐवजी कर्जमाफीवर प्रश्न विचारला गेल्याने अजित पवारांनी आपली नाराजी स्पष्टपणे दर्शविली. संतापलेल्या पवारांनी तरुणांना उद्येशून म्हणाले याला द्या रे मुख्यमंत्रीपद, ते पुढे म्हणाले "सगळी सोंग करता येतात पैशाच सोंग करता येत नाही". ते पुढे म्हणाले की, आम्ही इथे "गोट्या खेळायला" आलेलो नाही. यावेळी अजित पवार यांचा पारा चढलेला दिसला. त्यांनी मी सहा वाजल्यापासून दौरा सुरू केला आहे. आम्हाला कळतं, जे काम करतात त्यांचीच मारा असं म्हणत त्या युवकाला गप्प बसवलं.

यावेळी, त्यांनी पूर येण्याचे कारणही स्पष्ट केले. धरणातील पाणी आणि कॅचमेंट एरियातील पाणी हे सर्व उतारावरून खाली आल्यामुळे हे मोठे संकट उभे राहिले आहे. मात्र, त्यांनी पूरग्रस्तांना धीर न गमावण्याचे आवाहन केले.

याव्यतिरिक्त, मदतीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, ते आज लाडक्या बहिणींना वर्षाकाठी ४५ हजार कोटी रुपये मदत करतात. कामाचा उल्लेख करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख केला आणि ते काय काम करत आहेत हे सर्वांना कळतेय, असे सूचित केले.

अजित पवार बीड दौऱ्यावर असताना म्हणाले, मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. याचबरोबर अजित पवार यांनी मुलं तुमच्या मोबाईलवर काय करतात याकडं देखील लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी एका महिलेचं उदाहरण देत तिचे सरकारी योजनेचे जमा झालेला पैसे मुलानं गेमिंगमध्ये गमावल्याचं सांगितलं. तुमची मुलं काय करतात काय नाही याकडं लक्ष द्या असं देखील ते म्हणाले.