कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाटलाग करून खून

कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाटलाग करून खून

 

कोल्हापूर:- कोल्हापूर शहरालगत फुलेवाडी येथील गंगाई लॉन परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी पाठलाग करून सराईत गुन्हेगार महेश राख याचा निर्घृण खून केला. या हल्ल्यात विश्वजीत फाले हा गंभीर जखमी झाला आहे.

हल्ल्यानंतर संशयित आरोपी फरार झाले असून करवीर पोलीस ठाण्याकडून त्यांचा शोध सुरू आहे. महेश राख हा नुकताच हद्दपारची शिक्षा भोगून शुक्रवारी शहरात दाखल झाला होता. शहरात दाखल झाल्यानंतर काही तासातच त्याच्यावर घातक हल्ला झाला.

हल्ल्यात मृत्यू झालेला आणि जखमी झालेले दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

गुन्ह्यातील संशयितांमध्ये आदित्य शशिकांत गवळी, हर्षद गवळी (दोघे रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी), हर्षवर्धन शर्मा (रा. रामानंद नगर, कोल्हापूर), शुभम साळोकें (समर), पियुष कांबळे (रा. सध्या मुक्काम, शाहूपुरी, कोल्हापूर), पियुष पाटील (रा. नाना पाटील नगर), यशम कुटे (रा. बी.के. कॉलनी, कोल्हापूर) आदींचा समावेश असून इतरही काहीजण आरोपी म्हणून नमूद आहेत.