ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार, जीआर आम्हाला दाखवलेला नाही’’ ; भुजबळांचा सूचक इशारा!
समाजातील प्रत्येकजण आपल्या परीने काम करतोय आणि मी देखील आपल्या पद्धतीने जे काही काम करायचं आहे, ते मी करणार आहे. समता परिषद, आम्ही ज्या पद्धतीने जायचं आहे, त्या पद्धतीने पुढे जातो आहोत.’’
तसंच ‘’माझं म्हणणं केवळ एवढंच आहे की, हा जो जीआर आहे त्यातील शब्दरचना ही पुढे ओबीसींसाठी अडचणीची ठरणार आहे. आज जरी कुणी सांगितलं जात असेल की, कुणालाच त्रास नाही, मराठ्याचे सगळे प्रश्न सुटेल तर कोणी म्हणतं तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबसी झाले हे जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे. खरं खोटं नक्की काय हे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’ असंही भुजबळांनी सांगितलं.
याशिवाय, ‘’ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत. मराठा जात एकच आहे आमच्याकडे ३७४ जाती आहेत. परंतु सगळ्याचा उद्देश हाच आहे की, ओबीसींचं आरक्षण कमी होता कामा नये. जर आंदोलनानेच सगळं होत असेल तर ओबीसी समाजही आंदोलनासाठी उतरेल.’’ असा इशाराही यावेळी भुजबळांनी दिला.
याचबरोबर ‘’ओबीसी समाजातील ३७४ जातीमधील प्रत्येकाची मागणी आहे की, ओबीसीला दाबलं जावू नये. दुसरे जे कोणते मोठे घटक आहेत, ज्यांना उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसी आयोगाने नाकारलं आहे त्यांना ओबीसीत जागा दिली नाही पाहीजे. या विचारावर सर्वांचं एकमत आहे, आता विविध प्रकारे प्रत्येकजण काम करत आहे. आमची लोकं कोर्टातही नक्कीच जातील.’’ अशा शब्दांत भुजबळांनी भूमिका स्पष्ट करत, सूचक इशाराही दिला आहे.