मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा... मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही गरिबांच्या पोरांनी नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्राचा जीआर काढायला सरकारला भाग पाडले तर अर्धा महाराष्ट्र वेडा झाला आहे. काही अभ्यासक वेडे झाले काहींना तर झोप येईना यावरुन दिसते की तो मजूबत जीआर आहे. पण सरकारने कुणाच्या दबावाखाली काही बदल केले तर आम्ही मोठा निर्णय घेऊ शकतो. हैद्राबाद गॅझेटनुसार नोंद नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा,असेही मनोज जरांगे म्हणाले.
मराठवाडा १०० टक्के आरक्षणमध्ये जाणार. आनंद झाला आहे सर्वांनी संयम ठेवावा. आपला विजय झाला पण खुप जणांना पचत नाही. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबाद गॅझेट नोंदी नुसार प्रमाणपत्र द्या. जीआरनुसार नोंदी आणि त्यानुसार प्रमाणपत्र द्या, असे जरांगे म्हणाले.
येवला वाल्याचे ऐकू नका. तुम्ही आमच्या मागे लागले तर आम्ही तुमच्या मागे लागू. मला ५० टक्क्यांतूनच आरक्षण पाहिजे. वेळ आल्यावर जशाच तसे बघू.आम्हाला चॅलेंज केले तर, मी १९९४ चा जीआर रद्द करायला भाग पाडणार. १७ सप्टेंबरच्या आत मराठवाड्यात मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र दिसले पाहिजे. मराठा तरुणांवरील गुन्ह्याबाबत जरांगे म्हणाले की आम्ही कुणावर हल्ले केलेले नाहीतर, उलट आमच्यावरच हल्ले झाले आहेत. आझाद मैदानावर विखे पाटील यांनी मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे असेही जरांगे म्हणाले.