आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याला तीव्र विरोध, ठाकरे गट रस्त्यावर उतरणार!

आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याला तीव्र विरोध, ठाकरे गट रस्त्यावर उतरणार!

 

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आधी मराठा आंदोलन व मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे वातावरण तापल्यानंतर आता ओबीसी समाजानं मराठा आरक्षणासंदर्भातल्या सरकारच्या जीआरला विरोध केल्यामुळे नव्या आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात सध्या दुबईत चालू असलेल्या आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे या सामन्यासमोर राजकीय विरोधाचं संकट उभं राहिल्याचं दिसत आहे.