जयपुर येथे आयोजित केलेल्या कृषी महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत शारदानगर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थयांनी पटकवले विजेतेपद

जयपुर येथे आयोजित केलेल्या कृषी महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत शारदानगर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थयांनी पटकवले विजेतेपद

 

बारामती: राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जयपुर येथे आयोजित केलेल्या कृषी महाविद्यालयांच्या अंतर महाविद्यालयाने वाद विवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत  ३ आणि ४ सप्टेंबर २०२५ रोजी, जैनपूर येथील शरद कृषी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा २५-२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २० महाविद्यालयांनी भाग घेतला होता, ज्यात एकूण १२० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कृषी विद्यापीठाचे विध्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी  यांच्या हस्ते झाला.

एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे  डॉ. शरदचंद्र पवार कृषी  महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय शारदानगर बारामती या दोन्ही महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाची रनर-अप  जनरल चॅम्पियनशिप पटकावली.

यामध्ये सहकारिता या विषयावरील हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेतील  वादविवाद स्पर्धेत ए. बी. एम. महाविद्यालयच्या गायत्री शर्मा हिने प्रथम  क्रमांक  आणि कृषीच्या जिग्नेश पाटील याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ए. बी. एम. च्या श्रीयश पाटील याने ‘लोकसंख्या आणि पर्यावरण’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.  

त्याचप्रमाणे, शिक्षा मंडळ, वर्धा आणि एक्स चॅन्सलर पी.सी. अलेक्झांडर द्वारे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत, बारामतीच्या आज कृषी महाविद्यालयातील कृषी शाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी जिग्नेश राजेंद्र पाटील याने इंग्लिश या भाषेतून या दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे तसेच ओम निलेश पाटे याने मराठी भाषेतून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यामुळे महाविद्यालयाने एकूण १२ गुणाची कमाई करून प्रथम क्रमांकाची रनर-अप जनरल चॅम्पियनशिप पटकावली. 

तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर तेरा विद्यार्थ्यांनीही मौल्यवान अनुभव मिळवला.  यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. राहुल मारुती बेलदार यांनी काम पाहिले. या यशाबद्दल एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार आणि शिक्षण संचालक निलेश नलावडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.