ओबीसींच्या बैठकीला लक्ष्मण हाके का गेले नाहीत? बंजारा आरक्षणाबद्दल भूमिका काय?, दिलं स्पष्टीकरण
बैठकीबद्दल भूमिका स्पष्ट करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मला बैठकीचा निरोप होता पण राज्यात माझ्या विविध ठिकाणी सभा आहेत. विजय वड्डेटीवार हे ओबीसी समाजाबद्दल भूमिका घेत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. ओबीसी समाजाच्या बाजूने कोणी येत असेल तर हाके त्यांच्यासोबत उभा आहे. बारामती, लातूर, गेवराईमध्ये ओबीसीमधील लोकं बाहेर येत आहेत. संघर्ष यात्रा महाराष्ट्रात काढली जाणार आहे.
बंजारा आरक्षणावर बोलताना हाके म्हणाले, सरकारला मुळात जीआर काढण्याचा अधिकार नाही. एससी, एसटी समाज, बंजारा समाज मागणी करतो आहे ती न्यायिक बाब आहे. सरकारने काढलेला जीआर चुकीचा आहे, कारण उपसमितीला असा अधिकार नाही.
जरांगेंना मंडल आयोग कळतो का?
मनोज जरांगेंवर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले की, १९९४चा जीआर असा-तसा लागू झालेला नाही. ९ न्यायाधीशांचे बेंच होतं.. मग मंडल आयोग लागू झाला. जरांगेंना मंडल आयोग काय कळतो? तुम्ही असं काही केलं तर तुम्हाला देशात तोंड दाखवता येणार नाही. असं काही झालं तर पंतप्रधान यांना विचार करावा लागेल, मग तेव्हा तुम्ही किस झाड की पत्ती? या माणसाचा हेतू ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आहे, असा घणाघात हाकेंनी केला.