बारामती नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद माळेगाव नगरपंचायत काँग्रेस स्वबळावर लढणार श्रीरंग चव्हाण पाटील

बारामती नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद माळेगाव नगरपंचायत काँग्रेस स्वबळावर लढणार श्रीरंग चव्हाण पाटील

 

बारामती:- बारामती नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद माळेगाव नगरपंचायत काँग्रेस पक्ष सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा श्रीरंग चव्हाण पाटील यांनी केली.

बारामती शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी ताकदिने सज्ज व्हावे असे आवाहन भाऊसाहेब आसबे ( निरीक्षक बारामती काँग्रेस कमिटी तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस)  यांनी केले यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहळ खजिनदार लहू अण्णा निवंगणे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव अर्चना पाटील, प्रकाश म्हस्के  यांसह ऍड. आकाश मोरे शहराध्यक्ष ऍड. अशोक इंगोले तालुकाध्यक्ष राजेंद्र राजे निंबाळकर डॉ. विजय भिसे वैभव बुरुंगले सुरज भोसले, ऍड.राहुल वाबळे रमेश जगदाळे भारत रामचंद्र यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वोट चोर गद्दी छोड साठी बारामती शहरामध्ये सह्यांची मोहीम राबविण्यात आली.