बारामती दूध संघाने केले ११कोटी ५४ लाखाचे वाटप

बारामती दूध संघाने केले ११कोटी ५४ लाखाचे वाटप

 

बारामती:-  बारामती तालुका सहकारी दूधउत्पादक संघाने शेतकरी,प्राथमिक दूध संस्था,कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.दिवाळी निमि त्त ११ कोटी५४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.या बाबत संघाचे अध्यक्ष संजय कोकरे व उपाध्यक्ष दत्तात्रय वावगे यांनी माहिती दिली.

    बारामती दूध संघाचे काम काज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. संघाचे सरासरी प्रति दिन २.७१ लाख लिटर्स दूध संकलन आहे. तसेच सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात पुरविलेल्या दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५५ पैसे व प्राथमिक दूध संस्थांना प्रतिलिटर १५ पैसे याप्रमाणे प्रतिलिटर ७० पैसे दूध दरफरक ६.९२ कोटी, सभासद लाभांश १३ टक्के प्रमाणे १.११ कोटी, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानच्या विक्रीवर शेतकऱ्यांना प्रति पोते २५ रुपये व संस्थांना २५ रुपये याप्रमाणे ५० रुपये पशुखाद्य फरकापोटी १.७ कोटी रुपये देण्यात आले. संघाच्या कायम कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस पोटी १.६० कोटी रुपये तर इन्सेन्टीव्ही व बक्षीस म्हणून १२.५० टक्क्याप्रमाणे ८३.९३ लाख रुपये असे २. ४४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. संघामार्फत दीपावलीनिमित्त

सभासद,प्राथमिक संस्था,दूध उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांना असे एकूण रक्कम ११ कोटी ५४ लाख रुपये दिले गेले असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.योगेश राणे व उपमहाव्यवस्थापक अमोल चव्हाण यांनी सांगितले.दूध संघामार्फत सर्व प्राथमिक दूध

संस्थांना पशुवैद्यकीय सेवा- सुविधा,आर्युवेदिक उपचार पध्दत,प्रशिक्षण,मुरघास प्रशिक्षण दिले जाते.तसेच दुध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर,मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर विक्री केली जाते.याप्रमाणे सन २०२४-२५ मध्ये दूध उत्पादक शेतक-यांना १५.६७ लाख रुपये एवढे अनुदान दिले आहे.

      बारामती दूध संघाचे दूध शेतकऱ्यांसाठी उत्पादक योग्य किंमतीत नंदन सुप्रिम,नंदन गोल्ड,नंदन गोल्ड प्लस,नंदन सिलव्हर,नंदन काफ स्टार्टर, नंदन गर्भसत्व इत्यादी पशु खाद्य तसेच नंदन मिल्कमीन, नंदन समृध्दी(फिड सप्लीमेंट) इत्यादी प्रकारचे दर्जेदार उत्पा दने विक्रीस बाजारात आणली आहेत.बारामती तालुक्यासह, दौंड,पुरंदर,फलटण,इंदापूर, करमाळा,टेंभूर्णी,सोलापूर इत्यादि ठिकाणी विक्री केली जाते.