बारामती नगरपालिका निवडणुकीत किती पॅनल उभे राहणार?राजकीय रंगत वाढली

बारामती नगरपालिका निवडणुकीत किती पॅनल उभे राहणार?राजकीय रंगत वाढली

 

बारामती: बारामती नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आजपर्यंत २ अर्ज दाखल झाले असून, नगरसेवक पदांसाठी एकूण 24 अर्ज प्राप्त झाले आहेत.अशी माहिती प्रशासनाने दिली.त्यामुळे बारामतीत एकतर्फी निवडणूक होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार स्वतः बारामतीत दाखल झाल्याने राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षकार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निवडणुकीत कोणती रणनीती आखली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे,भारतीय जनता पक्ष देखील आपला पॅनल उभारणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे निवडणूक एकतर्फी न राहता तीन-चार पॅनल होणार का?हे पहावं लागेल.त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते काळुराम चौधरी यांनीही आपला अर्ज दाखल केला असून या लढतीत बसपाचाही सहभाग निश्चित झाला आहे.

आता सर्वांची नजर शिंदे गटाच्या भूमिकेकडे लागली आहे. शिंदे गट स्वतंत्र पॅनल उभे करणार की कुणाला पाठिंबा देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आज पुन्हा बारामतीत दाखल झाले असून,उद्या राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असणार आणि नगरसेवक म्हणून कोणाची निवड होणार, याबाबत बारामतीसह जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.