राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष पद तसेच नगरसेवक पदांसाठी उमेदवारी जाहीर... नगराध्यक्षपदाचे सचिन सातव उमेदवार!
यासोबतच राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक पदासाठीही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून अनेक नवीन चेहरे तसेच अनुभवी कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी जाहीर करण्यात आलेली नावे
राष्ट्रवादीची उमेदवार यादी : नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव, प्रभाग क्र. १ : मनीषा समीर चव्हाण, अविनाश निकाळजे, प्रभाग क्र. २ : जय पाटील, अनुप्रिता डांगे, प्रभाग क्र. ३ : प्रवीण दत्तू माने, रुपाली नवनाथ मलगुंडे, प्रभाग क्र. ४ : विष्णुपंत चौधर, संपदा चौधर, प्रभाग क्र. ५ : किशोर आप्पासाहेब मासाळ, ऋतुजा प्रताप पागळे,
प्रभाग क्र. ६ : अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल, प्रभाग क्र. ७ : प्रसाद खारतुडे, विश्वास शेळके, प्रभाग क्र. ८ : अमर धुमाळ, श्वेता योगेश नाळे, प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे, पूनम ज्योतीबा चव्हाण, प्रभाग क्र. १० : जयसिंग देशमुख, अनीता गायकवाड, प्रभाग क्र. ११ : संजय संघवी, सविता जाधव, प्रभाग क्र. १२ : अभिजीत चव्हाण, सारीका अमोल वाघमारे,
प्रभाग क्र. १३ : बिरजू भाऊसाहेब मांढरे, सुनीता अरविंद बगाडे, प्रभाग क्र. १४ : नवनाथ बल्लाळ, आप्पा अहिवळे, प्रभाग क्र. १५ : जितेंद्र बबनराव गुजर, मंगला जयप्रकाश किर्वे, प्रभाग क्र. १६ : मंगल शिवाजीराव जगताप, गोरख पारसे, प्रभाग क्र. १७ : अलताफ सय्यद, शर्मिला शिवाजीराव ढवाण,
प्रभाग क्र. १८ : राजेंद्र सोनवणे, अश्विनी सूरज सातव, प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सस्ते, प्रतिभा विजय खरात, प्रभाग क्र. २० : प्रथमेश प्रवीण गालिंदे, दर्शना विक्रांत तांबे, फरहिन फिरोज बागवानयादी जाहीर झाल्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे काळुराम चौधरी यांनी यापूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर शरद पवार गटही या निवडणुकीत उमेदवार उतरवणार असल्याचे निश्चित झाले आहे. भारतीय जनता पार्टी देखील निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय काही इतर पक्ष आणि स्थानिक पॅनेल्सदेखील आपली ताकद आजमावणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे आगामी बारामती नगरपालिकेची निवडणूक बहुकोनी आणि अटीतटीची होणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे. विविध पक्ष जोरदार प्रचारयोजना आखत असून बारामतीतील वातावरण जोरदार तापले आहे.