बारामती नगरपरिषद निवडणुक - राष्ट्रवादी काँग्रेसचे  (अजित पवार  गटाचे ) ८ उमेदवार बिनविरोध

बारामती नगरपरिषद निवडणुक - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे ) ८ उमेदवार बिनविरोध


 बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४१ पैकी ८ उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. किशोर मासाळ, अभिजित जाधव, अनुप्रिता डांगे, धनश्री बांदल, श्वेता नाळे, शर्मिला ढवाण, अश्विनी सातव, आफ्रिन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

अनुप्रिता डांगे यांच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीत वेगवान घडामोडी घडल्या. एका दिवसात उमेदवारांना बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे.

प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किशोर मासाळ बिनविरोध झाले. नगरपरिषदेच्या निवडणुकीतून ७७ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या दोन सदस्यांनी अर्ज माघारी घेतले.