मी जितेंद्र गुजर यांच्या पाठीशी ; यशपालच्या पाठीशी नाही -- सुनील पोटे

मी जितेंद्र गुजर यांच्या पाठीशी ; यशपालच्या पाठीशी नाही -- सुनील पोटे

 

बारामती: दि.२१ प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी पॅनलचे उमेदवार सौ.मंगल किर्वे व श्री.जितेंद्र बबनराव गुजर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज भिगवन चौक येथे करण्यात आला.तेली पंच मारुती मंदिर व सिद्धी गणेश मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली.

    या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री.सचिनशेठ सातव,माजी नगराध्यक्ष श्री. सुनील पोटे,श्री.सुभाष सोमानी,श्री.जय पाटील,श्री. अभिजीत काळे,श्री.ऋतुराज काळे,बिरजू मांढरे,अभिजीत चव्हाण,नितीन बागल यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर, मतदार व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

     दरम्यान,प्रभाग क्रमांक १५ कडे बारामतीकरांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या प्रभागात माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र,उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच सुनीलअण्णा पोटे यांनी तेली पंच मारुती मंदिर येथे तेली समाजातील बांधवांची विशेष बैठक आयोजित केली.

   या बैठकीत बोलताना सुनील पोटे म्हणाले, “अजितदादांनी माझ्या शब्दा खातीर माझी बहीण मंगल किर्वे यांना उमेदवारी दिलेली आहे.मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.यशपालला समजवण्याचा खुप प्रयत्न केला,परंतु तो ऐकत नाही. त्यामुळे मी या निवडणुकीत श्री.जितेंद्र बबनराव गुजर यांच्या बाजूने असून त्यांच्या प्रचारासाठी कार्यरत राहणार आहे.तुम्हीही कुणी यशपाल च्या पाठिशी उभे राहू नका असे सांगितले

     यावेळी सुनील पोटे यांनी आवाहन केले “अजितदादांनी माझा शब्द पाळला आहे, आपण त्यांचा शब्द डावलू नये.आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहून जितेंद्र गुजर यांना प्रचंड बहुमताने विजयी करू या.”

    सुनील पोटे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे प्रभाग १५ मधील होणारी  निवडणुक जितेंद्र गुजर यांच्यासाठी सुखकर झाली आहे.