नगराध्यक्ष सचिन सातव सह सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या – अजित पवार

नगराध्यक्ष सचिन सातव सह सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या – अजित पवार

 

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव सह सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी केले.

बारामती: बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र.1 ते 20 मधील उमेदवार व नगराध्यक्ष यांच्या प्रचाराचा नारळ वाढवताना ना.पवार बोलत होते. यावेळी 41 उमेदवार व 1 नगराध्यक्ष सचिन सातव तसेच पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना.पवार पुढे बोलताना म्हणाले की, देव दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिद्धेश्वराच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ करीत आहोत. 9 वर्षाने निवडणूका होत आहेत. सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांची साथ द्यावी. तुमच्या खंबीर साथ मुळे बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. बारामती नगरपरिषदेचे 40 कोटीचे उत्पन्न आहे पण ते साडेतीनशे कोटीपर्यंत जाते याचाही विचार केला पाहिजे.

नगराध्यक्षपद निवडताना कठीण होते. सर्व बाबींचा विचार करून सचिन सातव यांची निवड करण्यात आली. पवार साहेबांच्या राजकारणापासून कारभारी आण्णा, विनोदकुमार गुजर इ. सहकार्य केले. नगरसेवक पद निवडताना काही समाजास उमेदवारी देता आली नाही मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी लक्ष घालणार आहे. बारामतीची पुढील दिशा ठरवणारी निवडणूक आहे असेही ते म्हणाले.

मी कामाचा माणूस बिनकामाचा नाही. बारामती नगरपरिषदेची सीबीएससी स्कूल शारदा प्रांगणात उभे करणार आहे. बारामतीचा चौफेर झालेल्या विकासामुळे 12 महिने ग्राहक बारामतीला लाभत आहेत. अन्यथा ऐन दिवाळीच्या वेळी पेमेंट सोडा म्हणून साहेबांना सांगावे लागत होते तेव्हा बाजारात तेजी येत होती. बारामती शैक्षणिक हब म्हणून ओळखली जात आहे. पशुवैद्यकीय दवाखाना, चार पदरी रस्ते, रिंग रोड तिरंगा सर्कल ते डायनामिक्स रस्ता बनविण्याचा आहे. पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बारामतीकरांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम मी केलेले नाही. अंधःश्रद्धा मानत नाही पण श्रद्धा आहे. पावसाळ्यात पाऊस झाला थोडं कुठं पाणी तुंबले की लगेच तुंबले…तुंबले म्हणून बोंब मारली जाते. पाणी जाण्याच्या ठिकाणी काही अडकले का नाही हे पाहण्या आधीच आरोप केले जाते.

बारामतीचे रेल्वे स्टेशन नंबर एकचे केलेले आहे. प्रशासकीय इमारतीच्या बाजुला 10 कोटींचे बगीचा करीत आहे. सदरची जागा शासनाकडून घेऊन नगरपरिषदेला वर्ग केली आहे. सर्व महापुरूषांचे पुतळे एकाच ठिकणी उभारण्यासाठी जागेचे नियोजन करण्यात आले आहे. 35 एकरात 650 कोटींचे शिवसृष्टीचे काम सुरू आहे. उर्वरीत 350 कोटी रूपये देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र व राज्याची योजना यांची सांगड घालून डीपीडीसी व सीएसआर यांच्या माध्यमातून गोर-गरीबांसाठी घर बांधणीचा कार्यक्रम हाती घेणार आहोत.

झाडे लावायची आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे यास बारामतीकरांनी विशेषतः महिला लाडक्या बहिणींची साथ मला हवी आहे असेही ते म्हणाले. बारामतीच्या सुशोभिकरणासाठी 1 हजार 975 कोटी दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोणीही नाराज होऊ नका एक दिलाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करा. 4 जागा स्विकृतसाठी आहेत मी आपला विचार करून त्याठिकाणी घेण्यासाठी प्रयत्न करेन. सुंदर बारामती, स्वच्छ बारामती व हरीत बारामतीचा नावलौकीक व्हावा असे मनोमन वाटते असेही त्यांनी यावेळी सांगून आठ उमेदवार बिनविरोध झालेबद्दल त्यांचे अभिनंदन करीत, आठ उमेदवारांना बिनविरोध करण्याकामी ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास व विकास पाहुन जी मदत केली त्यांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले. त्यांनी बोलताना सांगितले की, बारामतीचा विकास व अजितदादांचे कामावर विश्वास ठेवून अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 महिला व 2 पुरूष असे 8 जागा बिनविरोध झाले आहे. येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर बटण दावून बहुमताने निवडून द्या असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल साळवे यांनी केले.