आता रंगणार राजकीय कलगीतुरा; बारामतीत 'राष्ट्रवादी'ची जोरदार मुसंडी
बारामती: येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत आठ जागा बिनविरोध निवडून आणल्या. पक्षाकडून आणखी चार जागांसाठी प्रयत्न सुरू होते, मात्र त्याला यश मिळाले नाही, अन्यथा डझनभर जागा बिनविरोध झाल्या असत्या. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी बारामतीत घडल्या. काही जागा बिनविरोध व्हाव्यात, यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच राष्ट्रवादी प्रिसचे किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, अमर घुमा यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुसार आठ सदस्य बिनविरोध निवडून गेले आहेत. दरम्यान, शेवटच्या दिवशी नगरसेवकपदासाठी ७७ जणांनी तर नगराध्यक्षपदासाठी दोन जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
बिनविरोध
प्रभाग दोन अ-अनुप्रिता तांबे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), पाच अ- किशोर मासाळ, (नागरिकांचा मागास प्रवर्ग), सहा अ (सर्वसाधारण महिला), सहा ब अभिजित जाधव (सर्वसाधारण), सात अ- श्वेता नाळे (नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला), सतरा ब शर्मिला वाण (सर्वसाधारण महिला), अठरा ब अश्विनी सातव (सर्वसाधारण महिला), बीस ब अफरीन बागवान (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला).
इतिहास घडला
नगर परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच यंदाच्या निवडणुकीसाठी आठ नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्यामुळे नवीन अध्याय सुरू झाला आहे. आठपैकी सहा जागांवर महिला नगरसेविका बिनविरोध विजयी झाल्या आहेत. नगर परिषदेची स्थापना १ जानेवारी १८६५ रोजी झाली. त्यावेळेपासून झालेल्या सर्वांचा इतिहास पाहता कधीही एवढे नगरसेवक बिनविरोध निवडून गेल्याचा उल्लेख नाही.
नगराध्यक्ष
पात्र एकूण अर्ज संख्या - १६
मागे घेतलेले अर्ज संख्या - २
शिल्लक एकूण अर्ज संख्या - १४
नगरसेवक
पदाच्या जागा - ४१
पात्र एकूण अर्ज संख्या - २४०
मागे घेतलेले अर्ज संख्या - ७०
शिल्लक एकूण अर्ज - १६५