राज्याच्या राजकारणात भूकंपाचे; शिंदेंचे ३५ आमदार नाराज! ऑपरेशन लोटसमध्ये पक्ष फुटणार?
- शिवसेना शिंदे गट व भाजपात संघर्ष
- भाजपा ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिंदेंचे ३५ आमदार फोडणार
- महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्य चालू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
भाजपा ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे (शिंदे) ३५ आमदार फोडणार आहे, असा दावा शिवसेना (उबाठा) पक्षाने केला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले की, महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्य चालू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीत अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत.
हे आम्ही सहन करणार नाही. शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शाह म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपाने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे, असे उबाठा गटाने म्हटले आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे. भाषिक प्रांतावादाचे विष भाजपा पसरवत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. रोजच प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातो आहे पण ही नुसती गर्दी नाही तर लढणाऱ्या शिवसैनिकांचे हे सैन्य आहे, असेही ते म्हणाले.