पॉवर मॅरेथॉनला ५ हजारांहून अधिक धावपटू धावले

पॉवर मॅरेथॉनला ५ हजारांहून अधिक धावपटू धावले

 

बारामती - बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि उत्साहवर्धक अशी बारामती पॉवर मॅरेथॉन सिझन ३ बारामती येथे रेल्वे स्टेशन ग्राउंडवर टॉप पी ऋळोपशी, टॉप पी झरीरारॉळ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली झालेल्या मॅरेथॉनमध्ये राज्यासह देशभरातील ५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवत आरोग्य, शिस्त आणि क्रीडासंस्कृतीचा संदेश दिला. स्पर्धेने शहरातील वातावरण उत्साहाने भरले गेले. नागरिकांच्या उपस्थितीने आणि जल्लोषाने या क्रीडा सोहळ्याने आरोग्य, उत्साह आणि ऐक्याचा महाउत्सव म्हणून अविस्मरणीय ठसा उमटविला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉनचा शुभारंभ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मुख्य तहसीलदार व प्रांत अधिकारी वैभव नारवाडकर उपस्थित होते. एमआयडीसी बारामती ऑफिसचे सीईओ हनुमान पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे, प्रायोजक संस्थेच्या रूपाने रविराज रिअल्टी यांचे अधिकारी, नेचर डिलाईटचे डॉ. देसाई, वेंकोब चिकन कंपनीचे अंडे उत्पादक कंपनीचे डॉ. तुका आणि डॉ. मोघे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्य स्पर्धेत ४२.२ किमी फुल मॅरेथॉन, २१.१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी रन आणि ५ किमी फन रन अशा चार गटांमध्ये धावपटूंनी दमदार कामगिरीने उपस्थितांची दाद मिळवली. नागपूर येथील सात वर्षांची कुमारी आर्या पंकज टाकोणे हिने ५ किमी धाव २५ मिनिटांत पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. या क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून साक्षीदार झाले. प्रत्येक धावपटूस सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्यांना एकूण २० लाखांची पारितोषिके देण्यात आली. लकी ड्रॉ द्वारे पियाजो तर्फे भाग्यवान धावपटूस पियाजो व्हेस्पा स्कूटर देण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन बारामती स्पोर्टस फाउंडेशनने केले असून व्हेनकॉव नंबर १ चिक्त, एनईसीसी, रविराज रियाल्टी, प्रीतम ग्रुप, नेचर डिलाइट, फेरेरो, पियाजो, वाउली आणि अल्ट्राटेक ब्रँड्सचे सहकार्य लाभले.

मॅरेथॉनचे विजयी शिलेदार

विभागनिहाय मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

४२ किमी- एकूण निकाल (एकूण विजेते) महिला- आरती जानवर, राजनी सिंग, सिंधू उमेश. पुरुष (चशप उरींशसी)- बबलू पाटिंग चव्हाण, प्रदीप केरकेट्टा, योगेश सानप, 

२१ किमी - एकूण निकाल महिला- प्रियांका दादाजी दौरे, अभिलाषा मोडेकर,सौम्या पिल्लई. पुरुषांमध्ये (चशप उरींशस) - विशाल विष्णू कंबिरे, चांगदेव हिरामन लाटे, सुजल सोमनाथ सावत. 

१० किमी एकूण निकाल महिला- सुरेखा रामा माताणे, रोशनी भूषण निशाद, काजल भालचंद्र यादव. पुरुषांमध्ये- देशराज मीणा, कुनाल जाधव, गौरव पवार.