नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू
मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. आज निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज ही माहिती दिली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायत यांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या नगरपरिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा असा असेल कार्यक्रम :
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ७ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे : दि. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५
उमेदवारी अर्ज छाननी : दि. १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारीची मुदत : दि. २१ नोव्हेंबर २०२५
चिन्ह वाटप : दि. २६ नोव्हेंबर
मतदान : दि. २ डिसेंबर २०२५
मतमोजणी : दि. ३ डिसेंबर २०२५