२० डिसेंबरला कुठल्या २४ नगरपरिषदांसाठी होणार मतदान? वाचा यादी...

२० डिसेंबरला कुठल्या २४ नगरपरिषदांसाठी होणार मतदान? वाचा यादी...

 

न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगर पंचायतच्या अध्यक्ष, सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तर वाशीम जिल्ह्यातील वाशीम व रिसोड येथील काही प्रभागांचा समावेश आहे.

४ नोव्हेंबरला जाहीर झाला होता निवडणूक कार्यक्रम

राज्यात २४६ नगर पालिका व ४२ नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ०४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद आहे. अपील दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत येणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारास त्याचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास तीन दिवसाचा कालावधी मिळाला असता. काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याने ही कार्यवाही नियमबाह्य ठरल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. अपील दाखल असलेल्या ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली.

१९ डिसेंबरला रात्री १० पर्यंत प्रचार

निवडणूक आयोगाच्या प्राप्त निर्देशानुसार मतदानांच्या अगोदरच्या रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त डॉ. विश्वनाथ वडजे यांनी दिली.

१६ जिल्ह्यांतील २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबरला मतदान

१) अंबरनाथ, ठाणे

२) कोपरगाव, देवळाली, प्रवरा, पाथर्डी, नेवासा; अहिल्यानगर

३) बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची, पुणे

४) अनगर, मंगळवेढा, सातारा- सोलापूर

५) महाबळेश्वर, फलटण-सातारा

६) फुलंब्री- छ. संभाजी नगर

७) मुखेड, धर्माबाद- नांदेड

८) निलंगा, रेणापूर- लातूर

९) अंजनगाव, सुर्जी- अमरावती

१०) वसमत-हिंगोली

११) बाळापूर-अकोला

१२) यवतमाळ

१३) वाशिम

१४) देऊळगावराजा-बुलढाणा

१५) देवळी-वर्धा

१६) घुग्घुस-चंद्रपूर

अशा २४ ठिकाणी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. २१ डिसेंबरला लागणाऱ्या निकालांकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच ठिकाणी २१ डिसेंबर मतमोजणी होईल