बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम; १११ बुलेट सायलेंसरवर फिरवला रोडरोलर

बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम; १११ बुलेट सायलेंसरवर फिरवला रोडरोलर

 

बारामती: बारामती शहरात बुलेट मोटर सायकल चे फटाका आवाजाचे सायलेंसर बसवून शहरात फटक्यासारखा आवाज करत फिरण्याची जणू फॅशनच झाली होती. त्याचा सामान्य नागरिकांना नेहमीच त्रास होत होता. 

अशा बुलेट मोटर सायकल वर कारवाई करण्याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती वाहतूक शाखेकडून बुलेट मोटर सायकल कारवाई ची विशेष मोहीम बारामती शहरात विविध ठिकाणी राबवण्यात आली. 

सदर मोहिमेमध्ये फटाका आवाज करणारे, बुलेट मोटर सायकलचे एकूण 111 सायलेन्सर काढून बारामती वाहतूक शाखेकडे जमा करण्यात आले आहेत.  

अवैद्य प्रवासी वाहतूक कारवाई :- 6
ड्रंक अँड ड्राईव्ह :- 5
काळी काच:- 51 फिल्मिंग काढण्यात आले.

तसेच खालीलप्रमाणे कलमान्वये कारवाई
1. विना नंबर प्लेट 
2. ट्रिपल सीट
3. विना लायसन्स 
4. फॅन्सी नंबर प्लेट
5. विना इन्शुरन्स  
6. मोबाईल संभाषण 
7. काळी काच 
8. नो पार्किंग 
9. नो एंट्री 

अशा एकूण कारवाई 05/11/2025 ते 16/12/2025 रोजीपर्यंतच्या कालावधीत एकूण 2141 केसेस करून 21,58,350/ रुपये अशी मोटार वाहन कायद्यांतर्गत वरील विविध कलमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
       
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल सो पुणे ग्रामीण. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सो, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सो बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश माने श्रेणी पीएसआय सुभाष काळे, पोलिस हवालदार प्रदीप काळे, पोलिस अंमलदार दत्तात्रय भोसले, अजिंक्य कदम, आकाश कांबळे, महिला अंमलदार सीमा घुले, सुनीता ढेंबरे, आशा शिरतोडे, माया निगडे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, रेश्मा काळे, पोलिस अंमलदार अमोल मदने, योगेश कुंभार, प्रवीण सांगळे, श्रीधर कांबळे, सुनील भंडारे होमगार्ड जवान अजित बिबे, थोरात, भंडलकर, पोंदकुले, खोमणे, नवले यांनी केली आहे.