अविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
बारामती: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, शारदानगर – बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने अविष्कार २०२५ आंतर-महाविद्यालयीन संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेस ३७ महाविद्यालयातील एकूण २२७ विद्यार्थी संशोधक (१२३ मुले, १०४ मुली) यांनी स्पर्धेतील ६ प्रमुख संशोधन गटांमध्ये प्रकल्प सादर केले होते. त्यात विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी कु. श्रुती मोरे व कु. श्रावणी क्षीरसागर हिने सहभाग नोंदविला होता.
त्यातील युजी वर्गात ३० विद्यार्थ्यामध्ये विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कु. श्रावणी क्षीरसागर या विद्यार्थिनीने ऊल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय परितोषिक मिळविले. व तिचे पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या प्रकल्पासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुमन देवरुमठ, प्रा. रेवती रेड्डीयार व प्रा. अक्षय सपकाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचा ऊदेश विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी हा होता.
विद्यार्थ्यांच्या अश्या प्रभावी कामगिरीमुळे संस्थेची नावीन्यपूर्णता, संशोधन वृत्ती आणि शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना मिळते. विद्यार्थ्याच्या उज्वल यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, उपाध्यक्ष अँड, अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड नीलिमा गुजर, विश्वस्त मा. अजितदादा पवार, मा. विठ्ठलदास मणियार, सौ. सुप्रिया सुळे, सौ सुनेत्रा पवार, मा. प्रतापराव पवार, डॉ राजीव शहा, श्री किरण गुजर श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल श्रीषं कंबोज तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.