‘पार्थ पवार प्रकरणावर विरोधकांना जाब विचारण्याची ताकद नाही’ – अंजली दमानिया

‘पार्थ पवार प्रकरणावर विरोधकांना जाब विचारण्याची ताकद नाही’ – अंजली दमानिया

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्याप्रकरणी त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या अटकेबाबतची सुनावणी शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार आहे. तोपर्यंत त्यांच्या मंत्रिपदाला अभय मिळाले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती माध्यमांच्या हवाल्याने मिळत आहे. कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागल्यास महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा दुसरा धक्का असेल. याआधी धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. लवकरच त्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसमध्ये त्या गेल्या काही काळापासून नाराज असल्याचे वृत्त आहे.