लाखोंची फसवणूक करणारा फरार आरोपी २ वर्षांनंतर जेरबंद
1 डिसेंबर रोजी आरोपी आपल्या पवारवाडी येथील राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने शिताफीने सापळा रचला आणि आरोपीला त्याच्या घराजवळून जेरबंद करण्यात आले. सदर गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासला जात आहे. आरोपीने इतर नागरिकांचीही फसवणूक केली आहे का ? याचा तपास सुरू असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षकरमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक बारामती शहर श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.
नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहन
पर्यटन, गुंतवणूक, लॉटरी किंवा इतर कोणत्याही आर्थिक आमिषांवर विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करावी. संशयास्पद परिस्थिती दिसल्यास त्वरित पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.