महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याने डायरेक्ट दिल्लीत राजकीय ताकद दाखवली! सत्ताधारी विरोधकांसह सर्व बड्या नेत्यांना एकाचवेळी एकाच ठिकाणी बोलावले
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेता अशी ओळख असणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवारांची विविध क्षेत्रात असलेली ताकद पुन्हा एकदा दिसली. सत्ताधारी विरोधकांसह देशातील सर्व बडे राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी झाले. अजित पवार देखील यावेळी उपस्थित होते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनासाठी सर्व खासदार, मंत्री तसेच बडे नेते दिल्लीत उपस्थित आहते. 12 जानेवारीला शरद पवारांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला शरद पवार मुंबईत उपस्थित असणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व खासदार पोहोचले. तसेच मोदी सरकारमधील या स्नेहभोजनासाठी उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित राहिले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी,, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव कुमार देव, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, भाजप नेते बैजयंत जय पांडा, भाजप खासदार अनुप धोत्रे, भाजप नेते शहनवाज हुसेन, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, काँग्रेस नेते मणिकम टागोर, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा, माजी केंद्रीय मंत्री डी. राजा, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरीका घोष, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई उपस्थित होते.