मराठी पत्रकार दिनानिमीत्त मंगळवार ६ जानेवारीला विविध कार्यक्रम

मराठी पत्रकार दिनानिमीत्त मंगळवार ६ जानेवारीला विविध कार्यक्रम

 

बारामती:- महाराष्ट्र राज्य शासनाचे माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे बारामती मधील प्रशासकीय भवन येथील उपमाहिती कार्यालयात बारामती तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने मंगळवार दि.६ रोजी सकाळी १०.३० वा. प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सर्व पत्रकारांना शुभेच्छा व चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

     तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर यांच्या वतीने दुपारी २ वाजता पीडीसीसी बँकेच्या बारामती येथील मुख्य शाखेतील वसंतदादा सभागृहात शुभेच्छा व चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमांना सर्व पत्रकार बंधुं-भगिनींनी उपस्थित रहावे असे अवाहन माहिती सहाय्यक संदिप राठोड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर यांनी केले आहे.