बारामतीत मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिर; १५० हून अधिक बालरुग्णांचा सहभाग

बारामतीत मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिर; १५० हून अधिक बालरुग्णांचा सहभाग

 

बारामती :- शहरातील नामांकित मुथा यांचे श्रीपाल हॉस्पिटलचे मुथा,डॉक्टर संतोष जोशी आणि डॉक्टर सौरभ मुथा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल हृदयरोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास पंचक्रोशी तील बालकांचे पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. 

   या शिबिरामध्ये लहान मुलांच्या हृदयाची अत्याधुनिक टुडी,इको तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली.

तपासणी दरम्यान हृदयरोगाचे निदान झालेल्या बालरुग्णांना पुढील उपचारही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टरांनी दिली. 

    या उपक्रमामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठाच दिलासा मिळाला आहे.या शिबिराला पालकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १५० हून अधिक बालरुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला. समाजातील गोरगरीब लहान मुलांच्या आरोग्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवणार असल्याचे डॉक्टर राजेंद्र मुथा यांनी सांगितले.