माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली तावरे, तर स्वीकृत नगरसेवकपदी किरण खोमणे; एडवोकेट राहुल तावरे यांची निवड
माळेगाव: माळेगाव नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे यांची निवड करण्यात आली आहे.
स्वीकृत नगरसेवकपदी किरण शंकर खोमणे यांची निवड करण्यात आली असून,या नियुक्तीमुळे नगरपालिकेतील प्रशासन व विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तसेच एडवोकेट राहुल अशोक तावरे याचीही स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली असून त्यांच्या कायदेविषयक अनुभवाचा फायदा नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नगरपालिका गटनेतेपदी जयदीप दिलीप तावरे यांची निवड करण्यात आली असून,ते सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडतील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तर उपगट नेतेपदी साधना स्वरूप वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा अनुभव लक्षात घेता ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
या सर्व नियुक्त्यांमुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा आशावाद कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.