इंजिनात बिघाड, पायलटवर संशय, मालक फरार; रोहित पवारांकडून पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट!
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असतानाच या अपघातात विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती काल (१७ फेब्रुवारी) रोजी नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. मात्र, या माहितीनंतर अनेकांनी यावर ताशेरे ओढले. ब्लॅक बॉक्ससारखी यंत्रणा जळू कशी शकते असा सवाल उपस्थित केला जात असतानाच, आमदार रोहित पवार यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. तसंच, या अपघाताशी संबंधित सर्वच शक्यतांबाबत आज त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
“तपास यंत्रणांनी तपास सुरू केलाय, पण या तपासाचा वेग कमी आहे. मुंबई आणि दिल्लीतील पीसी झाल्यानंतर हा अपघात नसून घातपतच आहे, यावर लोकांचा विश्वास बसायला लागला आहे. वीसीआर कंपनीच्या बाबतीत मी दाखले दिले होते, त्यावर तज्ज्ञ बोलत आहेत. अधिकचे फ्युएल टँक त्या विमानात होते, अशीही शंका व्यक्त केली होती. ब्लॅक बॉक्ससंदर्भातही मी शंका उपस्थित केले होते. पण दुर्दैवं असं की नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सचा काही भाग जळला असं पत्रक जारी केलं”, असं रोहित पवार म्हणाले.
विमानाचे बरेच स्फोट झाले होते. २०२३चं विमान मोठं होतं. हे विमान रनवेवर पडलं होतं. ते डांबरी होतं. पण दादांचं विमान साईडला पडलं. जर बॉल फरशीवर टाकला तर बाऊन्स जास्त होतो, पण मातीत टाकला तर कमी बाऊन्स होतो. तसंच, दादांचं विमान रनवेवर पडलं नाही, त्यामुळे त्याची वेलोसिटी कमी होती. मग स्फोट का झाला? त्यामुळे त्यात अधिकचे फ्युएल टँक होते, म्हणून स्फोट झाला ही आमची शंका खरी होत आहे. हे फ्युएल टँक टॉयलेटच्या बाजूला असतात. त्याच्याच मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो, असं रोहित पवार म्हणाले.
या पंख्यात टँक फुल भरला होता. बारामतीला जाऊन हैदराबादला गेला असतात तरी तिथेही फ्युएल भरू शकले असते. त्यामुळे एवढं फ्युएल पंखात बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? पायलटचा वापर करून घातपात झाला असावा, त्यात फ्युएल जास्त असल्याने मोठा स्फोट होईल अशी शंका खरी होताना दिसते आहे. हा फ्लाइट प्लान आहे. पण डीजीसीएला ते फ्लाईन प्लान कळवला नव्हता, असं रोहित पवार म्हणाले.
पुणे, सातारा, चिप विमानतळावर ते उतरू शकत नव्हते. ते पुन्हा मुंबई विमानतळावर विमान उतरवू शकत होते. पण त्यांनी तसं न करता बारामतीतच लँड करण्याचा प्रयत्न केला. फ्युएल भरलं होतं, त्यात अधिकचं टँक होतं. त्यामुळे हे विमान जाणीवपूर्वक आदळण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला.
फ्लाइक प्लॅन मॅन्युपुलेट (बदल) करता येतात. या अपघाताचे कागदपत्र करण्याचं काम विमान कंपनी वीएसआर कंपनीकडून चालू आहे. त्यामुळे कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्ही फुटेज किंवा इमेलचे पुरावे ग्राह्य धरावे, अशी विनंतही रोहित पवार यांनी तपास यंत्रणांना केली आहे.
ब्लॅक बॉक्स कसा जळाला?
ब्लॅक बॉक्स ११०० सेल्सिअस डिग्रीवर आगीत पडला तर तो जळतो. व्हॉइस रेकॉर्डिंग असतं आणि एफडीआर असतं. किती तरी हजार हत्ती प्रेशर केले तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. तिथे बरेसचे कागद जळाले नव्हते. कारण, स्फोटाचा भपका काही सेकंदापुरता असतो, तो नंतर विझून जातो. तो भपका अंदाजे १००० सेल्सिअस डिग्रीच्या आसपास असू शकतो. विमानाची बॉडी अॅल्युमिनिअम अलॉय असते. ६३५ डिग्री सेल्सिअसवर हे मटेरिअल वितळू शकतं. बाकीचा भाग १७६० डिग्रीला वितळतं. विमानाची बॉडीचा भाग आत असतो, त्याच्या आत ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजेच, आम्ही आज पत्रकार परिषद घेणार होतो, त्यामुळे काल नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सविषयी घाईगडबडीत माहिती दिली, असाही दावा रोहित पवारांनी केला.
इन्शुरन्सविषयी पायलटला माहित होतं का?
“ते विमान ३५ कोटीला घेतलं होतं. पण त्या विमानाची आजची किंमत १०-१५ कोटीच आहे. पण १० कोटीतही हे विमान कोणी घेणार नाही, अशी त्याची परिस्थिती होती. आजची त्याची इन्शुरन्स व्हॅल्यु ५५ कोटी होतं. लायबॅलिटि इन्शुरन्स २१० कोटी होतं. यामध्ये पायलटही आले. यात पाचही जण आले. मेन पायलट होता, त्याला किती रुपये मिळणार हा प्रश्न आहे. ही गोष्ट त्या पायलटला माहित होतं का?” अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
अकाऊंटेबल मॅनेजर कुठे?
अकाऊंटेबल मॅनेजर, चीफ ऑफ सेफ्टी, डिरेक्टर ऑफ ट्रेनिंग यांच्या मुलाखती डीजीसीएकडून होतात. त्यांनी ओके दिल्यावरच ते कंपनी त्यांना कामावर घेते. अपघात झाल्यावर या तिघांची जबाबदारी असते. पण या प्रकरणात हे तिन्ही व्यक्ती कुठे आहेत? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला.
सुमित पाठक दोन्ही विमाने चालवत होते
जर पायलटने लिगसी विमानाचे प्रशिक्षण घेतले असेल तर तो केवळ लिगसी उडवू शकतो. तो लेअरजेट उडवू शकत नाही. मात्र वीसीआर मध्ये पायलटकडून कोणीही विमाने उडवून घेतली जात होती. रोहित सिंग आणि सुमित कपूर हे दोघेही लिगसी तसेच लेअरजेट दोन्ही विमान उडवत होते. कागदं रंगवारंगवी करणं सोडून द्या, त्या कागदात फरक दिसला तर हे योग्य ठरणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला.
पायटल विमानात कार्यरत होण्याआधी त्याची ब्रीथ अनालायजर म्हणजे दारू प्यायला की नाही याची तपासणी मशिनद्वारे केली जाते. त्याचे व्हिडिओही काढले जातात. त्यामुळे सुमित पाठकचे बीए टेस्टचे व्हिडिओ आम्हाला दाखवा. तसंच, वीसीआरकडे असलेल्या मशिनमध्ये तारखा बदलल्या जाऊ शकतात. म्हणून हा तपास वेगाने करण्याची आमची मागणी आहे. दरम्यान, २०२३ मध्ये अपघात प्रकरणातील पायलट सुनील कंजरचाही दोनवेळा परवाना रद्द झाला होता. दारूमुळेच त्याचा परवाना रद्द झाला होता. मोठ्या कंपन्यांत ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, ते इथं काम करतात, असा दावाही त्यांनी केला.
टेक्निकल एजंसी असताना मॉडेल चुकवले
लेअरजेट ४५ एक्सआर या विमानाचा अपघात झाला आहे. मात्र, नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सबाबत जी माहिती दिली ती लेअरजेट ४५ ची जदिली. वीसीआर च्या वेबसाईटनुसार त्यांच्याकडे सात लेअरजेटचे विमान आहेत. त्यापैकी केवळ एकच विमान लेअरजेट ४५ आहे. डीजीसीएला विमान कुठले आहे हे माहीत नसेल तर अपघाताची चौकशी कशी होणार? टेक्निकल एजंसी असून मॉडेलमध्ये चूक कशी केली? असाही प्रश्न उपस्थित केला.