मतदान केंद्रावर दादांच्या आठवणी सांगताना रोहित पवार भावुक...विलीनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
ते म्हणाले, "ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला, त्या दिवसापासून मी येथे मतदान करतो. आज दादांबरोबरच्या चर्चा माझ्या मनात ऐकू येत होत्या. दादांची इच्छा होती की, जास्तीत जास्त कार्यकर्ते त्यांच्या विचाराचे निवडून यावेत. मतदार त्यांची इच्छा पूर्ण करतील. तसेच, परिवार एकत्र राहावा ही दादांची मनापासूनची इच्छा होती, असे सांगून रोहित म्हणाले, "दादांकडून प्रयत्न झाले होते. आम्हीही प्रयत्न करू. परिवार अजूनही एकत्र आहे आणि तसेच राहील, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान शुक्रवारी (ता. ६) व्हायरल झालेल्या रोहित पवार, पार्थ पवार आणि शरद पवारांच्या व्हिडिओबद्दल बोलताना रोहित म्हणाले, पवार साहेबांकडून काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होते. काल आमच्या तिघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली तर ते आम्हाला बोलवून घेतात आणि मार्गदर्शन करतात." विलीनीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले १२ तारखेला पत्रकार परिषदेत मी सांगेल. दादांची काय इच्छा होती, विलीनीकरण का होणार होते, त्यात राजकीय की भावनिक अंग आहे, हे सांगेल," असे त्यांनी सांगितले.