बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मतदान

बारामतीच्या काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मतदान

 

बारामती: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीवर दुःखाचे सावट आहे. उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी बारामतीतील काटेवाडी येथे सकाळी मतदान केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

काटेवाडी आणि परिसरात सकाळपासून मतदारांची चांगली उपस्थिती दिसून आली. निवडणूक यंत्रणेकडून सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडत असल्याची माहिती देण्यात आली. बारामतीतील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.