‘एमपीएससी’ची गुणवत्ता यादी जाहीर, नीलेश मनोहरराव महाजन राज्यात पहिला

‘एमपीएससी’ची गुणवत्ता यादी जाहीर, नीलेश मनोहरराव महाजन राज्यात पहिला

 

मुंबई: सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट – ब या संवर्गाच्या मुलाखती ११ व १२ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. विचाराधीन संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथे दाखल (मूळ अर्ज ४२/२०२६) प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रस्तुत संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र/कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी, उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो किंवा उमेदवार अपात्र देखील ठरू शकतो याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. नीलेश मनोहरराव महाजन यामध्ये पहिले आहेत. या गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांचे गुणही जाहीर करण्यात आले आहेत.

नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाला एकही पद नाही. अलिबागमध्ये २९ पदे असून, यात आदिवासींना केवळ एक पद, साताऱ्यात ३१ पदे असून, इथेही एकच पद आहे.

परभणीत २२ पदे असून, यात दोन पदे आदिवासींना आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी व सातारा येथील विविध विभागातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- ब या संवर्गातील पदांच्या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. एमपीएससीमार्फत ५ डिसेंबर २०२३ रोजी तशी जाहिरात देण्यात आली होती. सहायक प्राध्यापक पदांच्या ५८० जागा असून, नव्याने स्थापन झालेल्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील १८५ पदे अशा एकूण ७६५ जागांचा समावेश आहे. याची परीक्षा झाली असून तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

सहायक प्राध्यापक, क्षयरोग व उरोरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट – ब या संवर्गाच्या मुलाखती ११ व १२ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. मुलाखतीनंतर आता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.