"...तर त्यांना योग्य उत्तर देईन", शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाबद्दलच्या लेखावरून सुनील तटकरेंचा संताप
विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकामध्ये लिहिलेल्या लेखात विलिनीकरणाचा मुद्दा अधोरेखित केला. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण सूत्रे अजित पवारांकडेच देण्याचा निर्णय झाला होता, असे शिंदे म्हणाले. पण, त्याच्या एका विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला.
१२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे देण्याचा निर्णयही शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता, असा शिंदे यांनी या लेखात म्हटले आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेसचे मासिक दर महिन्याला प्रकाशित होते. मी अध्यक्ष असताना पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित व्हायचे. पण, आता ती तारीख योगायोग आहे की, मुद्दामहून १२ तारखेनंतर १३ तारखेला लिहायचं म्हणून... याबद्दल मला काही बोलायचं नाहीये", असेही तटकरे यांनी सांगितले.