बारामती टपाल कार्यालयांत डिजिटल पेमेंटला जोरदार प्रतिसाद
डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचे बारामती मंडलाचे टपाल अधीक्षक केतन शित्रे यांनी सांगितले. डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये बारामती विभागात पाच तालुक्यांतील विविध टपाल कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने डिजिटल व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पीड पोस्ट पत्र, पार्सल, मनी ऑर्डर, बिलभरणा, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फँकिंग मशिन रिचार्ज, ग््राामीण डाक जीवनविमा, डाक जीवनविमा या सर्व सेवांसाठी ग््रााहकांना आता क्यूआर कोड स्कॅन करून किंवा डेबिट कार्ड वापरून डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची अतिरिक्त सुविधा प्रत्येक टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात एकूण सुमारे 4,961 हजारांहून अधिक डिजिटल व्यवहार झाले. त्याद्वारे सुमारे 3,48,610 रुपये महसूल जमा झाला. डिसेंबर महिन्यात ही संख्या आणखी वाढली. 8,643 जास्त व्यवहारांमुळे महसूल 6,43,586 रुपयांपर्यंत पोहचला. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात डिजिटल व्यवहारांमधून सुमारे 10 लाखापेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला. मागील तिमाहीमध्ये एकूण 13 हजार व्यवहारांमधून सुमारे 12 लाख महसूल मिळाला.
डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग््रााहकांचा वेळ वाचत असून, रोख रक्कम तसेच सुट्टे पैसे जवळ ठेवण्याचा त्रास वाचला आहे. त्यामुळे काउंटरवर व्यवहार करणे अधिक सुलभ झाले आहे. डिजिटल व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून, ’तुमचा मोबाईलच तुमचे पाकीट!’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणे शक्य झाले आहे. पुढील काळात या डिजिटल पेमेंटचा वापर अधिक वाढेल आणि ’डिजिटल इंडिया’च्या उपक्रमाला अधिक हातभार लागेल, असा विश्वास शित्रे यांनी व्यक्त केला.