अजित दादांच्या विमान अपघाताचा धक्कादायक खुलासा! ब्लॅक बॉक्समधून अनेक गोष्टी उघड; वैमानिकांचे शेवटचे शब्दही समोर

अजित दादांच्या विमान अपघाताचा धक्कादायक खुलासा! ब्लॅक बॉक्समधून अनेक गोष्टी उघड; वैमानिकांचे शेवटचे शब्दही समोर

 

मुंबई: २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला होता. आज २८ फेब्रुवारी, या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.

प्राथमिक चौकशी अहवालात काय ?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने सादर केलेल्या २२ पानी अहवालात अपघाताची क्रमवारी आणि संभाव्य कारणांचा उल्लेख आहे.

ब्लॅक बॉक्सची स्थिती: फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) उष्णतेमुळे खराब झाला, पण रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला आहे.

अपघाताची क्रमवारी: विमान कोसळताना प्रथम झाडावर धडकले, नंतर जमिनीवर पडले.

हवामान: अपघातवेळी दृष्यमानता फक्त २,००० मीटर होती.

वैमानिकांचा अनुभव: दोन्ही वैमानिकांना (पुरुष आणि महिला) बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता.

रनवेपासून अंतर: रनवे सुरुवातीला ५० मीटर बाहेर विमान कोसळले.

संवाद: सकाळी ८:१९ वाजता वैमानिकाचा बारामती ATC सोबत शेवटचा संवाद झाला.

आरोग्य तपासणी: दोन्ही वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह.

ओरड: महिला वैमानिकाने "ओ शीट, ओ शीट" असा उद्गार काढला.

इंधन: उड्डाणावेळी विमानात सुमारे २,८०० लिटर इंधन होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सीआयडी चौकशी सुरू असून राष्ट्रवादी अजित पवार गट नेत्या अदिती तटकरे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.