'...त्या गद्दाराला सुनेत्रा पवार सोडणार नाहीत,' अजित पवारांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरींनी दिला इशारा, ते गद्दार कोण?
झी 24 तासच्या 'टू द पॉइंट विथ कमलेश सुतार' मुलाखतीत त्यांनी अनेक दावे आणि आरोप केले. आम्हाला अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. ममता बॅनर्जींनी आधी संशय व्यक्त केला. शरद पवारांनी परिस्थिती सांभाळण्यासाठी अपघात आहे सांगितलं असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे असंही ते म्हणाले.
'विमानात 6 सांगितले आणि 5 जण आढळले तिथेच पहिला संशय'
"अजित पवारांचं अचानक जाणं यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे. सोशल मीडियावरही हीच भावना दिसत आहे. अजित पवारांसारखा नेता जो सीटबेल्ट लावलयाशिवाय बसत नाही, त्यांचं असं निधन झालं हे पाहून संशयाची पाल चुकचुकते. विमानात 6 सांगितले आणि 5 जण आढळले तिथेच पहिला संशय आला. साहिल मदन आणि यश हे पायलट आम्ही ट्राफिकमध्ये अडकलो सांगतो. सुमित कपूर अटेंडंट पायलट होता. आता सुमित कपूर जिवंत आहे असं सांगितलं जात आहे. यामुळेच आम्हाला दादांच्या विमानाचा घातपातच झाला आहे असं वाटतं," असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
'दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच'
"ब्लॅक बॉक्स इतक्या दिवसांनी सापडतो. मुरलीधर मोहोळ यांनी पहाटे धुकं होतं, पण स्पष्ट सूर्यप्रकाश होता सांगितलं. विमान कोसळण्यापूर्वी एक स्फोट झाला आणि नंतर एक स्फोट झाला त्यामुळे शंकेला वाव होता. महाराष्ट्राच्या मनातील जनभावना मी विचारत आहे. माझं मन म्हणतंय की दादांच्या विमानाचा अपघात असू शकत नाही तो घातपातच आहे," असं ते ठाणपणे म्हणाले.
मला अजित पवारंनी तिथे बसवलं आहे. ते फार जागरुक होते आणि सहकाऱ्यांचीही काळजी घेत होते. पुरावे नाही, पण तर्क मांडण्यास काही हरकत नाही. साहिल मदन आणि यश कुठे आहेत, सीसीटीव्ही कुठे आहे? काल रेड एअरवेजवर एएआयबीने छापा टाकला, मग व्हीयएआरवर का नाही?," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
'हेच राजीव गांधींच्या संदर्भात झालं ना...'
"महाराष्ट्राचा बापमाणूस गेला आहे. महाराष्ट्राला व्हिजन देणार माणूस गेला आहे. माझी फक्त एक शंका आहे, साहिल मदन कुठे आहे? त्यावेळी ट्राफिकमध्ये कुठे अडकला होता? मग तो गेला कुठे? महाराष्ट्राच्या मनाला पडलेले हे प्रश्न मी विचारत आहे. व्हीएसआरच्या पायलटवर 50 कोटींचा विमा उतरवल्याचा आरोप केला तो त्यांना खोडता का आला नाही? सुसाईड बॉम्बर म्हणून सुमित कपूरला पाठवला नसेल का? तर्कात बसत नसतील तर 50 कोटींचे विमे उतरवले खोटं असेल तर व्हीएसआरने खुलासा करावा. जर तू गेला तर कुटुंबाला पोसतो सांगितलं असेल. हेच राजीव गांधींच्या संदर्भात झालं ना...गूढ उकललं नाही तर मुंडे, सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ कायम आहे. जर अजित पवार काचेची बाटली वापरु लागले असतील तर त्यांना कोणीतरी धोका करु शकतो अशी भीती वाटत होती," असंही ते म्हणाले.
'सुनेत्रा पवार सोडणार नाहीत'
"सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवला नसले हे कशावरुन? त्याची बॉडी कुठे आहे? काही जण म्हणतात तो कॅलिफोर्नियात मुलीला भेटत आहे. प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे. अजित पवारांसारखा नेता गमावल्याचं दुख महाराष्ट्राला आहे. या गोष्टीची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीअंती सगळं सिद्ध होईल. जो कणी गद्दार असेल त्याला सुनेत्रा पवार सोडणार नाहीत. बदला घेतल्य़ाशिवाय राहणार नाहीत," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
"आम्हाला अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय पहिल्या दिवसापासून आहे. ममता बॅनर्जींनी आधी संशय व्यक्त केला. शरद पवारांनी परिस्थिती सांभाळण्यासाठी अपघात आहे सांगितलं. पक्षालाही शंका होती म्हणून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिलं. जर घातपात सिद्ध झाला आणि कोणी आढळलं, तर कार्यकर्ता आणि सुनेत्रा पवार सोडणार नाहीत," असं त्यांनी सांगितलं.
"गद्दार कुठलाही असतो. आंतरबाह्य गद्दार असतात, घरातीलच असावा असं नाही. माझा रोख कोणाकडे नाही. ही महाराष्ट्राच्या मनातील जनभावना आहे. हे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत. काही लोक स्पष्ट भूमिका मांडत नसतील, मी मांडतो. बाकीच्यांना बोलावं न बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. ऑफ रेकॉर्ड ते बोलतात, पण मीडियासमोर बोलत नाहीत. माझं अभिनंदनही करतात की तुम्ही चांगली बूमिका घेता. एकतर दवाबाखाली असतील किंवा प्रश्न विचारायची हिंमत नसावी. तुमच्या मतदारसंघातील जनता उद्या तुम्हाला हे प्रश्न विचारेल. ते धक्क्यातून सावरलेले नसतील म्हणूनत बोलत नसतील," असं ते म्हणाले आहेत.