राज्यसभेच्या ७ जागांसाठी ९ अर्ज, तरीही निवडणूक होणार बिनविरोध; दोन अपक्षांनीही भरलेत अर्ज...

राज्यसभेच्या ७ जागांसाठी ९ अर्ज, तरीही निवडणूक होणार बिनविरोध; दोन अपक्षांनीही भरलेत अर्ज...

 

मुंबई : राज्यसभेच्या सात जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नऊ जणांनी अर्ज भरले असले तरी त्यातील दोन अर्जांवर सूचक, अनुमोदकांची नावे नसल्याने ते बाद ठरतील. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी आमदार रामराव वडकुते, माया इवनाते, पार्थ पवार आणि डॉ.ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.

शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणाने मुंबईतील निवासस्थानातूनच अर्ज भरला. भाजपला ४, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. उमेश म्हात्रे व कांते सायन्ना या दोन अपक्षांनीही अर्ज सादर केले पण त्यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या नसल्याने त्यांचे अर्ज बाद होतील.

उमेदवार अर्ज भरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे खा.प्रफुल्ल पटेल, खा.सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी उपस्थित होते.