तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहीणींना ठरवले अपात्र; रोहिणी खडसे यांचा सरकारच्या दुटप्पी धोरणावर हल्लाबोल
मुंबई: महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प नुकताच मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी २६५०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागील वर्ष २०२५-२६ च्या तुलनेत या तरतुदीत ९५०० कोटींची म्हणजेच २६ टक्क्यांची घट झाली आहे. लाडक्या बहीणींना दरमहा मिळणारे १५०० रूपये २१०० रूपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने दिले होते. त्यासाठी लाडक्या बहीणींना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीत घट झाल्याने रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर घणाघात केला आहे. सरकारने आतापर्यंत तब्बल १ कोटी पाच लाख लाडक्या बहीणींना अपात्र ठरवले आहे, शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता, अभी भाड़ में जाए जनता, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. खरंच लाडक्या बहीणींना अपात्र ठरवण्यात आले आहे का? याबाबत जाणून घेऊयात.
रोहिणी खडसे यांनी काय आरोप केला?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी लाडक्या बहीणींना अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप महायुती सरकारवर केला आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, “आता क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल १.०५ कोटी लाडक्या बहीणींना अपात्र ठरवले आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे ? २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा परिस्थिती काय होती ?”
दरम्यान, रोहिणी खडसे यांनी आकडेवारी देत सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यापुढे म्हणाल्या,