आता कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही; १ एप्रिलनंतर रेशनमध्ये होणार 'हे' मोठे बदल?
केंद्र सरकारच्या तन नेशन वन रेशन कार्ड योजनेला मोठे बळ मिळणार आहे. एप्रिलपासून पोर्टेबिलिटीवर धान्य घेण्यासाठी असलेले रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटविण्यात येणार आहेत.
त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध होणार आहे.
पुरवठा विभागाने यास मंजुरी दिली असून केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेला मोठे बळ मिळणार आहे.
पोर्टेबिलिटीवर धान्य घेण्यासाठी असलेले रेशन दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांना मागणीनुसार अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध होणार आहे.
पुरवठा विभागाने यास मंजुरी दिली असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्व कार्डधारकांना अनुदानित रेशन धान्य मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अन्न वितरण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत.
रेशन धान्याच्या पोर्टेबिलिटीसाठी अतिरिक्त १० ते १५ टक्के धान्य कोटा उपलब्ध करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार आमची मागणी शासनाकडून मान्य झाली असून एप्रिलपासून आता मागेल तितका धान्य कोटा वाढून मिळणार आहे.