बारामती येथे सुरु झाले नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सनी शिंदे यांचे ‘शिंदे हार्ट क्लिनिक’

बारामती येथे सुरु झाले नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सनी शिंदे यांचे ‘शिंदे हार्ट क्लिनिक’

      

बारामती: पुणे जिल्ह्यातील नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सनी शिंदे यांनी बारामतीत अत्याधुनिक सुविधा असलेले ‘शिंदे हार्ट क्लिनिक’ सुरू केले असून, त्यामुळे शहरातील व परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. हृदयरोगाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर बारामतीतच दर्जेदार आणि तातडीची हृदयविकार उपचार सुविधा उपलब्ध होणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.

डॉ. सनी शिंदे हे पुणे जिल्ह्यातील अनुभवी व विश्वासार्ह डॉक्टर म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत बारामतीतील नामांकित रुग्णालयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच विविध हृदयविकारांवरील शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रिया प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर डॉ. सनी शिंदे यांच्या सहकार्याने पार पडत होत्या.


आता या सर्व अत्याधुनिक सुविधा डॉ. शिंदे यांच्या स्वतःच्या ‘शिंदे हार्ट क्लिनिक’मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना एकाच ठिकाणी तपासणी, सल्ला, निदान आणि उपचाराची सुविधा मिळणार आहे.

विशेषतः गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना विविध शासकीय व आरोग्य योजनांच्या माध्यमातून योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन क्लिनिकमध्ये आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांसाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अचूक निदान व सुरक्षित शस्त्रक्रिया अधिक परिणामकारक पद्धतीने पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बारामतीसारख्या वाढत्या शहरात हृदयरोग उपचारांची स्वतंत्र व विश्वासार्ह सुविधा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ‘शिंदे हार्ट क्लिनिक’मुळे बारामतीकरांना आता पुणे किंवा इतर शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे.