पंतप्रधान मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची बैठक, कोणत्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली?

पंतप्रधान मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची बैठक, कोणत्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली?

 

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत आहेत. पश्चिम आशियातील या संघर्षाचा भारतावरही परिणाम होत आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक घेतली आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतात उद्भवणाऱ्या समस्या आणि जागतिक परिस्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगाने कोणती रणनीती ठरता येईल? तसेच ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी काय पावलं उचलता येतील? यासह आदी महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

या बरोबरच पंतप्रधान मोदी या बैठकीत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही महत्वाच्या सूचना देखील देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीला ज्या राज्यात विधानसभेची निवडणूक सुरू आहे त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांचा समावेश नव्हता.

‘टीम इंडिया’च्या भावनेतून सर्व राज्यांतील समन्वय आणि ताळमेळ साधण्याच्या अनुषंगानेही ही बैठक महत्वाची मानली जात होती. दरम्यान, या बैठकीत नेमकं काय ठरलं? नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? किंवा पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या का? याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर ही बैठक घेत आढावा घेतला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आव्हानात्मक असताना भारतातील सर्व राज्य आणि केंद्र यांच्यात योग्य समन्वय राखून ‘टीम इंडिया’ या भावनेला अधिक महत्त्व देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे.