न्यायमंदिर चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत माळशिरस संघ विजेता

न्यायमंदिर चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत माळशिरस संघ विजेता

 

बारामती: बारामती वकील संघटनेच्या वतीने आयोजित १न्यायमंदिर चषक २०२६ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली.कायदा क्षेत्रातील व्यक्तींमध्ये बंधुभाव एकात्मता व क्रीडास्पर्धेची भावना वाढविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

     स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. सी.बर्डे यांच्या हस्ते बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर करण्यात आले. राज्यातील पुणे,महाड,माव ळ राजगुरूनगर,जुन्नर,कराड, सातारा,अहिल्यानगर,राहाता, फलटण,वाई,दहिवडी,इंदापूर, माळशिरस,पिंपरी-चिंचवड व दौंड येथील संघांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील सामने अतिशय रंगतदार व चुरशीचे झाले.अंतिम फेरीत माळशिरस संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत विजेते पद पटकावले.बारामती १- संघाने उपविजेतेपद मिळवले

तर श्रीकांतपन्हाळे११सातारा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.अहिल्यानगर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.

      वैयक्तिक कामगिरीत तन्मय देव (माळशिरस) यांना अंतिम सामन्यातील मॅनऑफ द मॅच पुरस्कारमिळाला.शक्ती माने (माळशिरस) यांनी मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट 

बॅट्समन पुरस्कार पटकावले, तर डी.एस माने (माळशिरस) यांना बेस्ट बॉलर म्हणून गौर विण्यात आले. बारामतीच्या अनुराग खाडे यांना बेस्ट फिल्डर पुरस्कार दिला.

     विशेष म्हणजे,बारामती च्या दोन महिला क्रिकेट संघांनीही सहभाग घेत स्पर्धेचे आकर्षण वाढवले. स्पर्धेचे सर्व सामने युट्युबवर थेट प्रक्षेपित करण्यात आले होते,त्यामुळे क्रिकेटप्रेमींना घरबसल्या सामने पाहण्याची संधी मिळाली.यास्पर्धेला युवा नेते जय पवार,युगेंद्र पवार नगराध्यक्ष सचिन सातव  तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बारामतीतील वरिष्ठ व कनिष्ठ वकील, वकील संघटनेची कार्यकारिणी तसेच क्रिकेट कमिटीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष अँड.प्रसाद खारतुडे यांनी प्रास्ताविक केले,तर क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष ॲड.योगेश राऊत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ॲड.समीर शेख यांनी केले.