बारामती सहकारी बँकेला ४२.३४ कोटींचा ढोबळ नफा
बारामती: बारामती सहकारी बँकेने आर्थिकवर्ष ३१ मार्च २०२६ अखेर भक्कम आर्थिक कामगिरी नोंदवत ३६९९ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय करत ४२ कोटी १४ लाख रुपयांचा तरतुदीपूर्व ढोबळ नफा मिळविला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली.
बँकेने सर्व आवश्यक तरतुदी पूर्ण करून १५ कोटी ४८ लाख रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. बँकेचे नक्त मूल्य १६७ कोटी रुपयांवर पोहोचले असून, वसुलीत विक्रमी यश मिळवत निव्वळ अनुत्पादित
कजींचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. ढोबळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण ६.८७ टक्के असून भांडवल पर्याप्तता प्रमाण १६.६० टक्के इतके आहे.
बँकेला उत्कृष्ठ कार्यप्रणाली,गुणवत्ता व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केल्याबद्दल १आयएसओ
९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.ही उपलब्धी बँकेच्या विश्वासार्हतेचा आणि कार्यक्षमतेचा ठोस पुरावा असल्याचे अध्यक्षांनी नमूद केले.
बँकेचे कार्यक्षेत्र पुणे, सातारा सोलापूर,नाशिक, अहिल्यानगर आणि रायगड
या सहा जिल्ह्यांत विस्तारले असून ३६ शाखा व एक विस्तारित कक्ष कार्यरत आहे. ई-कर,ई-मुद्रांकन,पॅनकार्ड, मोबाईल बँकिंग,विमा सेवा, एकत्रित देयक प्रणाली यांसह तात्काळ निधी हस्तांतरण आणि एटीएम सुविधा उप लब्ध करून देण्यात आल्या आहेत.तसेच,बँकेने स्वतःची संगणकीय प्रणाली विकसित केली असून लवकरच नेट बँकिंग सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.बँकेच्या या यशस्वी वाटचालीत संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.