सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा

सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा

 


बारामती: अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत असून, महायुतीतील भाजपा, शिंदेसेना आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असून, आकाश मोरे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. आकाश मोरे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडूनच निवडणूक लढवली होती.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत असून, महायुतीतील भाजपा, शिंदेसेना आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असून, आकाश मोरे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. 

बारातमीत बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता संपली

अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न महायुतीचे आहेत. आतापर्यंत बारामती विधानस मतदारसंघात १९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

महाविकास आघाडीत फूट

बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. या जागेवर निवडणूक न लढवण्याची भूमिका महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धवसेना या पक्षांनी घेतली आहे. दोन्ही पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस निवडणुकीत उतरली आहे. 

राज्यसभा निवडणुकीपासून वाढली दरी

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार होती, अशीही चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते तयार नव्हते. आता काँग्रेसने थेट राष्ट्रवादी विरोधातच भूमिका घेतली आहे.   

आता काँग्रेसनेही उमेदवार जाहीर केल्याने राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने धनगर समाजातील उमेदवार सुनेत्रा पवारांविरोधात उतरवला आहे. बारामती मतदारसंघात धनगर मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मोरेंचे नाव निवडले गेल्याची चर्चा आहे.