बारामती पोटनिवडणुक प्रचाराचा कन्हेरीतून दमदार शुभारंभ

बारामती पोटनिवडणुक प्रचाराचा कन्हेरीतून दमदार शुभारंभ

 

  • कन्हेरीतील सभेतून सुनेत्रा पवार यांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश
बारामती: राजकारणात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वा ची असली तरी प्रत्यक्ष काम करणाऱ्यां कडे अनेकदा दुर्लक्ष होते, अशी भावना व्यक्त होत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना  ठोस संदेश देत संघटनात्मक बदलांची दिशा स्पष्ट केली. बारामती विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, कन्हेरी येथे शुभारंभाच्या  जाहीर सभेतून त्यांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली.

     सभेत बोलतांना पवार यांनी कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलण्यापुरते मर्यादित न राहता पक्ष आणि जनतेसाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्यांना न्याय दिला जाईल,असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानातून संघटनात काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला.

    महिला नेतृत्वाबाबत समाजातील दृष्टिकोनावर भाष्य करताना त्यांनी सांगि तले की,आजही महिलांच्या क्षमतेकडे संशयाने पाहिले जाते.‘मी ही जबाबदारी पार पाडू शकेन का ?’ अशी शंका अनेकांना होती ; मात्र त्या शंकांना कामातूनच उत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित महिलांकडून उस्फूर्त जोरदार प्रतिसाद मिळाला.

    ही निवडणूक वैयक्तिक नसून बारामतीकरांची सामुहिक लढाई असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी जनतेशी भावनिक नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाची जबाबदारी जशी सांभाळली,तशीच आतां बारामती व राज्याच्या जनतेची जबाबदारी उचलण्यास आपण सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.

   दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी भावनिक सूर लावला.    

बारामतीच्या विकासात त्यांचे योगदान मोठे असून त्यांनी घातलेला पाया अधिक मजबूत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या.यामुळे सभागृहात उपस्थित कार्यकर्ते व नागरिक भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

      सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार,नागरिक उपस्थित होते.कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका, महिला नेतृत्वाविषयीचा ठाम संदेश आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या तिन्ही मुद्यांमुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला प्रभावी सुरुवात झाल्याचे चित्र कन्हेरी येथील सभेतून स्पष्ट झाले.


महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दमदार शुभारंभ
      महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेला बारामती, इंदापूर,दौंड,पुरंदर व फलटण तालुक्यातील पवार प्रेमी मोठ्या प्रमाणात  हजर होते.

    यावेळी कृषीमंत्री दत्ता भरणे,आमदार सुनिल शेळके, आमदार सना मलीक, बालविकास मंत्री आदिती तटकरे,अविनाश मोटे,विश्वास देवकाते - आमदार संजय मांडेकर,बनसोडे, आमदार शंकर फांडेकर, सुरेश घुले, प्रा.दिगंबर दुर्गाडे,जालिंदर कामठे,जि.प.अध्यक्ष वीरधवल जगदाळे,ज्योती मेटे,जय पवार,अनुराधा नागवडे,वैशाली नागवडे, अर्चना पाटील कन्हेरीच्या सरपंच सुरेखा शेलार,पृथ्वी राज जाचक बारामती, इंदापूर,फलटण,दौंड,पुरंदर मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.