बांदलवाडीच्या  विद्यार्थ्यांना जन्मतारखेच्या क्रमानुसार नोट वितरण सोहळा संपन्न

बांदलवाडीच्या विद्यार्थ्यांना जन्मतारखेच्या क्रमानुसार नोट वितरण सोहळा संपन्न

 

बारामती: तालुक्यातील बांदलवाडी येथील क्रांती ग्रामविकास मंडळाचे विजय बालविकास मंदिर माध्यमिक विद्यालयात एक अनोखा आणि तितकाच कौतुस्कापद उपक्रम राबविण्यात आला. पुणे येथील इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी फॉर रियर ॲटम संस्थेच्या वतीने शाळेतील ३००विद्यार्थी शिक्ष कांना त्यांच्या प्रत्यक्ष जन्म तारखेचे अंक असलेल्या चलनी नोटांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये एक रुपया,पाच रुपये,दहा रुपये किमतीच्या  नोटांचा समावेश होता.या संस्थेचे उपाध्यक्ष कमलेश मोतीवाले,सदस्य सुरेश पोरवाल तसेच ज्यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला.दिनेश गुगळे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी महेंद्र ओसवाल, राजेंद्र ओसवाल,प्रा.सतीश गायकवाड विलास ताटे, विश्वास भोसले, मधुकर होले,केशव आगवणे,श्रीमती आशा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.      

      इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी गेले ३०-४० वर्षां पासून जुन्या वस्तुंचा संग्रह करणारी नामांकित संस्था आहे.या संस्थेच्या माध्यमातून पुणे व परिसरामध्ये जुन्या व दुर्मिळ वस्तूंची प्रदर्शने घेऊन लोकांना सदरच्या वस्तूंचे दर्शन घडवून आणतात. विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर जुन्या व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याच्या त्यांना सवय लागावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला.सर्व विद्यार्थी व शिक्षकांना ज्याचे,त्याचे  जन्मतारीख क्रमांकाच्या नोटांचा फ्रेम करून दिलेला फोटो दिल्यामुळे भारावलेले  विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.स्वप्निल जगताप यांनी केले तर प्रा.नितीन पिसाळ यांनी आभार मानले.