बारामतीत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

बारामतीत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

 

बारामती: बारामतीत शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या २५ मार्च २०२६ च्या निर्णयानुसार १ जानेवारी २०११ पूर्वीची आणि सध्या अस्तित्वात असलेली निवासी अतिक्रमणे नियमानुसार नियमित करण्यात येणार आहेत.

यासाठी पात्र नागरिकांनी ३० डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी पंचायत समितीकडे, तर नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचे आहेत.

मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, शासकीय निवासी पुरावे, उपग्रह छायाचित्र यांसारखे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. निर्धारित मुदतीत अर्ज करणाऱ्या पात्र नागरिकांना अतिक्रमण नियमित होईपर्यंत संरक्षण मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.