तेंदूपाने तोडायला गेलेल्या १३ महिलांवर वाघिणीचा हल्ला, चार महिला ठार

तेंदूपाने तोडायला गेलेल्या १३ महिलांवर वाघिणीचा हल्ला, चार महिला ठार

 


चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात वाघिणीच्या हल्ल्याने थरकाप उडाला. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने हल्ला केला. यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी समोर आली. महिला तेंदूपत्ता तोडण्याचे काम करत असतानाच अचानक वाघीण आली. महिलांनी वाचण्याचे प्रयत्न केले. पण, चार महिला वाघिणीच्या हल्ल्यात मारल्या गेल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, १३ महिला गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी सोबत गेल्या होत्या. तेंदूपत्ता तोडण्याचे काम सुरू असतानाच या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या वाघिणीच्या हल्ल्यामुळे घाबरल्या आणि सैरावैर पळत सुटल्या. पण, वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. 


तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या १३ महिलांपैकी एक महिला ओरडत गावात आली. तिने आरडाओरड करत गावकऱ्यांना गोळा केले आणि वाघिणीच्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले. तर इतर महिलाही सुखरूप असल्याची माहिती आहे. वनविभाग अधिक तपास करीत आहेत.


मागील वर्षी १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा(माल) जंगलात तीन महिलांचा वाघाने बळी घेतला होता. त्यानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.